सेवा पंधरवड्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

वडगावात सेवा पंधरवड्यात भटक्या-विमुक्त जमातींसाठी दाखले वाटप

बार्शीटाकळी : तालुक्यातील मौजे वडगाव येथे सेवा पंधरवड्याच्या उपक्रमांतर्गत भटक्या व विमुक्त जमातींच्या नागरिकांसाठी विविध दाखले व प्रमाणपत्र वाटप शिबिर आज (दि. 26 सप्टेंबर 2025) आयोजित करण्यात आले. ग्रामपंचायत वडगाव येथे झालेल्या या शिबिराचे मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी (मुर्तीजापूर) संदीपजी अपार यांनी केले.या शिबिरात नागरिकांना आधार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, इलेक्शन कार्ड, जात प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले आदी आवश्यक कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.शिबिराला तहसीलदार राजेशजी वजीरे (बार्शीटाकळी), मंडळ अधिकारी संदीपजी बोळे (खेरडा बुद्रुक), लिपिक शेगोकार (पुरवठा विभाग), सरपंच बाबर (वडगाव), पोलीस पाटील संजय नीलखन, ग्राम महसूल अधिकारी, सेतूधारक, रेशन दुकानदार, आधार कार्ड केंद्र संचालक यांसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.एकूण ८५ विविध दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार वजीरे यांनी लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गावकऱ्यांनी महसूल विभाग व तहसील कार्यालय बार्शीटाकळी यांच्या टीमचे आभार मानले.

read also : https://ajinkyabharat.com/sonam-wangchuk-arrested-leh-violence-case/