यंदा 8 ते 10 दिवस आधी होणार बोर्डाच्या परीक्षा
महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी
एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे.
तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे याबाबत
प्रसिद्धी पत्रक जारी करत माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे,
नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक,
लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडयात
आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवडयात
आयोजित केल्या जातात. सदर परीक्षांचा ऑनलाईन निकाल अनुक्रमे मे अखेरीस
आणि जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यात येतो.
त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी
जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवडयापासून घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे,
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर
आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना
पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे,
या बाबींचा सारासार विचार करता येत्या २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी
इ.१२ वी आणि इ.१०वीची परीक्षा नेहमीपेक्षा ८ ते १० दिवस आधी
आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे. त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक
आणि इतर परीक्षा ठरलेल्या तारखांना घेण्याचे नियोजित आहे, असं मंडळाने म्हटलं आहे.