सावित्रीबाई फुले समाजाला प्रेरणा देणारी शाळा

सावित्रीबाई फुले समाजाला प्रेरणा देणारी शाळा

पातूर शहरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाने

शिवजयंतीचा सुवर्णमुहूर्त साधत नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती मोहीम राबवली.

अपघातांमुळे होणारी जीवितहानी आणि त्याचा संपूर्ण कुटुंबावर होणारा परिणाम लक्षात घेऊन,

Related News

विद्यालयाने मासिक सभेत ठराव घेतला की, संस्थेशी जोडलेल्या प्रत्येक शिक्षक,

शिक्षकेतर कर्मचारी आणि सदस्यांनी घरा बाहेर पडताना हेल्मेट वापरण्याचा संकल्प करावा.

रस्ते अपघात कोणतीही पूर्वसूचना न देता घडतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हानी होते.

त्यामुळे हेल्मेट परिधान करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून,

आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत,

सावित्रीबाई फुले विद्यालयाने नागरिकांसाठी प्रेरणादायी पाऊल उचलले आहे.

या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पातूर तालुक्यातील नागरिकांनी

यापासून प्रेरणा घेत हेल्मेट वापरण्याची सवय लावावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

सुरक्षित वाहतुकीचा संदेश देणारी ही मोहीम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे.

Read more news here : https://ajinkyabharat.com/chhawa-india-pak-samanyacha-bata-sunday-insicor-earnings-lack/

Related News