सावकारीच्या पैशातून युवकाची हत्या; आरोपी अटकेत

सावकारीच्या पैशातून युवकाची हत्या; आरोपी अटकेत

अंढेरा (जि. बुलढाणा) : चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथील चौफुलीवर

सावकारीच्या वादातून भरत विरशीद (वय ४०, रा. नांद्राकोळी, ता. बुलढाणा)

याची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना २३ जून रोजी

Related News

दुपारी सुमारे २ वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून,

अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील वरूड येथील

ज्ञानेश्वर सुखदेव निकाळजे (वय २५) याने मृत भरत विरशीद याला १० लाख रुपये सावकारीवर दिले होते.

मात्र, या पैशांच्या परतफेडीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

वादातूनच ज्ञानेश्वर निकाळजे याने भरतच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला.

या हल्ल्यात भरत गंभीर जखमी झाला असून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे आणि कर्मचारी

भरत पोफळे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आरोपीस ताब्यात घेतले.

सध्या पोलिस आरोपीची कसून चौकशी करत असून ही हत्या सावकारीच्या पैशातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/st-paulsche-taikwando-khedu-tharle-champions/

Related News