सत्ता आल्यास धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करु!

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचा गौतम अदानी यांना इशारा, सरकारवर निशाणा

झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प टेंडरच्या मुद्द्यावर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य, केंद्र सरकार आणि

Related News

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई येथे आयजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी त्यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष विजयी झाल्यास

त्यांचे सरकार धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर रद्द करेल, अशी घोषणा केली आहे.

ज्यामुळे आगामी काळात भाजप, राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये

जोरदार राजकीय हेवे दावे पाहायला मिळू शकतात.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी

दिल्या जाणाऱ्या सवलतींवर टीका केली.

तसेच, मुंबईला आम्ही आदानी सिटी होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे ठामपणे म्हणाले.

लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेची खिल्ली उडवताना

उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला जोरदार टोले लगावले.

धारावी हे मुंबईतील सर्वात मोठे स्लम क्लस्टर आहे.

काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा), विरोधी महाविकास आघाडीचे दोन्ही भाग,

अदानी समूहाकडून राबविल्या जात असलेल्या अब्जावधी डॉलरच्या

धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करत आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/renovation-of-akola-bus-stand-started-know-where-you-will-get-the-bus/

Related News