शांतीवन सजल विहीर: प्रकट दिन सोहळ्यात भक्तांचा महासागर!

शांतीवन सजल विहीर: प्रकट दिन सोहळ्यात भक्तांचा महासागर!

अकोली जहागीर (अकोलखेड) येथील श्री संत गजानन महाराज संस्थान,

शांतीवन अमृततीर्थ सजल विहीर परिसर प्रकट दिन महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांच्या

लाखोंच्या उपस्थितीने गजबजून गेला.

Related News

गुरुवारी सकाळपासूनच श्रींच्या आणि सजल विहिरीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पहाटे ४ वाजल्यापासूनच पायी वारीतील भक्तांची वर्दळ सुरू झाली होती,

तर संध्याकाळपर्यंतही दर्शनासाठी भाविकांची गर्दी अविरत होती.

श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

प्रगट दिन उत्सवानिमित्त सकाळी श्रींच्या अभिषेकानंतर, रजत मुखवट्याच्या पालखीची नगरपरिक्रमा पार पडली.

सकाळी १० वाजता ह.भ.प. केशव महाराज उखळीकर (परळी वैजनाथ) यांचे काल्याचे कीर्तन झाले,

तर महायज्ञ अनुष्ठानानंतर पूर्णाहुती सोहळा पार पडला. या प्रसंगी महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला.

सजल विहीर परिसरात भव्य यात्रा

यात्रेत पंचक्रोशीतील अंबाडी, रुधाडी, केलपाणी, धारगड, दहीखेल, पोपटखेड,

अकोट, बोर्डी, शिवपूर आदी गावांतून हजारो भाविक सहभागी झाले. विशेषतः

आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

२० हजार स्क्वेअर फुटांचे भव्य सभागृह

भाविकांसाठी सजल विहीर परिसरात २० हजार स्क्वेअर फुट क्षमतेचे भव्य सभागृह उपलब्ध करण्यात आले आहे.

महाप्रसादासाठी हे सभागृह मोठ्या संख्येने भाविकांनी वापरले.

सुमारे एक लाखावर भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याची माहिती आहे.

मोफत वाहन सेवा व विविध संस्थांची सेवा

अकोट येथून येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे चालक-मालक संघटनेच्या वतीने मोफत वाहन सेवा उपलब्ध होती.

तसेच, विविध सामाजिक संस्थांनी चहा, फराळ, लिंबूसरबत आणि महाप्रसादाचे वाटप करून सेवाभाव जपला.

कडक पोलीस बंदोबस्त

भाविकांच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे अकोट ग्रामीण पोलीस, जिल्हा पोलीस अधीक्षक बचनसिंग,

उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल आणि ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या

मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

“गण गण गणात बोते” च्या जयघोषात भाविकांनी घेतले दर्शन!

संपूर्ण परिसर गजानन महाराजांच्या जयघोषांनी दुमदुमून गेला. भक्तांच्या सेवेसाठी विविध सुविधा

उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांनी प्रकट दिन महोत्सवाचा आनंद घेतला.

Click here for more updates :https://ajinkyabharat.com/dhananjay-mundenna-bells-palsy-ha-azar-nemka-kya-ai/

Related News