सरपंच पतीकडून चपराश्याला अर्वाच्या भाषेत दमदाटी

सरपंच पतीकडून चपराश्याला अर्वाच्या भाषेत दमदाटी

चान्नी पोलिसात तक्रार : ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल

चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव ग्राम पंचायतच्या सरपंच बसंतीबाई राधेश्याम राठी यांचे पती राधेश्याम राठी यांनी स्वतः

सरपंच असल्याचा दम देऊन उपोषण कर्ता महिलेचा उपोषण मागे घेण्याचे सांगून

वनदेव येथील रहिवासी चपराशी अनिल काशीराम पवार, याला फोनवर अर्वाच्या भाषेत दमदाटी करून

जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २१ जुलै रोजीच्या संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली,

याप्रकरणी चपराशी अनिल पवार यांनी ३० जुलै रोजी चान्नी पोलिसात तक्रार दिली आहे.

सावरगाव येथील मंजुळा जानकीराम डाखोरे ही महिला २१ जुलै रोजी रस्त्यासाठी सावरगाव ग्राम पंचायत कार्यालयासमोर

अन्नत्याग उपोषणाला बसली होती. सरपंच पती राधेश्याम राठी यांनी चपराश्याला फोन करून सांगितले की महिला तुझ एकते तिला उपोषण मागे

घ्यायला लाव या कारणावरून सरपंच पती राधेश्याम राठी यांनी चपराश्याला दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली

व चपराश्याच्या जीवाला त्याच्यापासून धोका असल्याचे चपराश्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/1-augustpassun-icici-bankechya-upi-written-fee-apply-applied-vyapyanasathi-mahatvacha/