सरफराज खानचा तडाखेबाज शतकाने मुंबईची सुटका

सरफराज खानचा तडाखेबाज शतकाने मुंबईची सुटका

सरफराज खानचा तडाखेबाज शतकाने मुंबईची सुटका

चेन्नई :  तब्बल 17 किलो वजन घटवून चर्चेत आलेल्या सरफराज खानने आपल्या बॅटने पुन्हा एकदा जोरदार उत्तर दिलं आहे.

बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळताना त्याने TNCA XI विरुद्ध अवघ्या 92 चेंडूत धडाकेबाज शतक ठोकलं. त्याच्या खेळीमध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

तब्बल 105 च्या स्ट्राईक रेटने खेळत सरफराजने संघाला अडचणीतून बाहेर काढलं.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. पण केवळ 98 धावांवर 3 गडी बाद झाल्याने संघ डगमगला. याच वेळी 33 व्या षटकात सरफराज मैदानात आला आणि पुढील

31 षटकांत शतक झळकावत सामन्याचे चित्र पालटले.

दोन महिन्यांत 17 किलो वजन घटवलं

सरफराज खानने दोन महिन्यांत तब्बल 17 किलो वजन कमी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. सोशल मीडियावर त्याच्या फिटनेसची चर्चा झाली होती. तरीसुद्धा त्याला इंग्लंडविरुद्धच्या

कसोटी मालिकेत भारतीय संघात संधी मिळाली नव्हती. मात्र त्याने इंडिया ‘ए’ तर्फे इंग्लंड लायन्सविरुद्ध 92 धावांची खेळी साकारली होती. आता फिटनेस आणि फॉर्म दोन्ही बाजूंनी

त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यामुळे लवकरच भारतीय कसोटी संघात पुनरागमन होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आयुष म्हात्रे, मुशीर खान अपयशी

मुंबईचे दोन्ही सलामीवीर आयुष म्हात्रे आणि मुशीर खान अपयशी ठरले. नवव्या षटकात म्हात्रेचा झेल सोनू यादवने घेतला. त्याने 25 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा केल्या. त्यानंतर मुशीर

आणि सुवेद पारकर यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी झाली. पण 30व्या षटकात मुशीर बाद झाला. त्याने 75 चेंडूत 30 धावा केल्या.

त्यानंतर सरफराजच्या शतकामुळे मुंबईने जोरदार पुनरागमन करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केली आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/amhi-aamchaya-deva-bhauchaya-sada-patheshi-1-lakh-25-thousand-bahini/