सरसकट कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांचे जळगाव जामोद येथे आंदोलन!

सरसकट कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांचे जळगाव जामोद येथे आंदोलन!

जळगाव (जामोद), २८ जुलै –

तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयावर धडक दिली.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्याची मागणी करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राज्यातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत असून, दररोज ८ ते ९ शेतकरी कर्जबाजारीपणामुळे

आत्महत्या करत असल्याची भीषण स्थिती आहे.

तरीसुद्धा शासनाने अद्याप सरसकट कर्जमाफी जाहीर केलेली नाही, ही बाब निषेधार्ह असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी त्यांच्या नावावरील ७/१२ कोरे करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:

1. सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करावा.

2. २०२३-२४ चा उर्वरित पीकविमा त्वरित वितरित करावा.

3. २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, ती तातडीने खात्यावर जमा करावी.

4. या वर्षी हुमणी अळीने मोठ्या प्रमाणात पीकनुकसान झाले असून, तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी.

या आंदोलनादरम्यान तहसीलदार पवन पाटील यांना निवेदन देण्यात आले.

Read Also : https://ajinkyabharat.com/thoroughly/