सरन्यायाधीशांच्या मातोश्री कमलाताई गवई

संघाच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदाच्या विजयादशमी उत्सवासाठी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई, कमलाताई गवई यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रण दिले आहे. संघाच्या अमरावती शाखेतर्फे हा कार्यक्रम 5 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजता श्रीमती नरसम्मा महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे.यंदा या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य आणि प्रज्ञा प्रवाहाचे संयोजक जे. नंदकुमार असतील. तर कमलाताई गवई देखील प्रमुख पाहुण्या म्हणून विचार मांडतील. या निमंत्रणामुळे समाजामध्ये विशेष चर्चा सुरू आहे कारण कमलाताई रिपब्लिकन पक्षाशी संबंधित आहेत आणि त्यांच्या व्यासपीठावरील विचारांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.कमलाताई गवई दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांचे पती आणि सरन्यायाधीशांचे वडील रा.सू. गवई यांनी विदर्भात रिपब्लिकन पक्षाची जबाबदारी सांभाळली होती. गवई कुटुंब रिपब्लिकन चळवळीशी संबंधित असून, त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे या निमंत्रणावर विशेष लक्ष केंद्रित झाले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी सोहळा साजरा केला जातो. प्रत्येक शाखेत समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण दिले जाते. यंदा अमरावती शाखेने प्रमुख पाहुण्या म्हणून कमलाताई गवई यांना आमंत्रित केले असून त्यांनी ते स्वीकारले आहे. कार्यक्रमात त्यांच्या विचारांचे स्वागत केले जाणार असून, सामाजिक आणि राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहे.

read also:https://ajinkyabharat.com/6-jilhiyanasathi-red-alert-issued/