सपकाळांचा हल्लाबोल: “ट्रिपल इंजिन सरकार गॅंगस ऑफ महाराष्ट्र; राज्यात धुडगूस सुरू”

सपकाळांचा हल्लाबोल: "ट्रिपल इंजिन सरकार गॅंगस ऑफ महाराष्ट्र; राज्यात धुडगूस सुरू"

राज्यातील गॅंगस ऑफ ट्रिपल इंजिन सरकार जरी असले तरी ते सारं काही आलबेल असल्याचा देखावा जरी करीत

असले तरी या सरकारकडून राज्यात धुडगूस घातल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

यांनी आज अकोल्यात केला आहे. दरम्यान त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून ही प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, दोन भाऊ एकत्र येत असतील तर चांगलंच आहे. याबद्दल कुणालाही काही वाटायला नको

असेही सपकाळ म्हणाले तर जो माणूस पत्ते खेळतो गुंडागर्दी करतो अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सरकार

असल्याचा आरोपही माणिकराव कोकाटे यांच्यावर सपकाळ यांनी केलाय. सपकाळ यांनी संजय शिरसाट यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

संजय शिरसाट हे पैसे मोजण्यात मश्गुल असल्याचं ते म्हणाले. यांचे अर्ध्या कपड्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत

तर इकडे समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याचे कपडे उतरवले जात असल्याची टीकाही सपकाळ

यांनी संजय शिरसाट यांच्यावर केलीय. तर राज्यपाल आणि राष्ट्रपती यांनी थेट आता सरकारला सूचना द्यावेत याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी भेटत आहे.

आह्मी पण त्यांना भेटू असेही ते म्हणाले. तर प्रदेश काँग्रेसची कार्यकारणी लवकरच जाहीर होणार असल्याचे ते म्हणाले

Byte – हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

Read Also : https://ajinkyabharat.com/rajyaat-qaeda-aani-suki-purna-kolmadali-ai/