संत्रा मृग बहाराचे देठ सुकी बुरशीजन्य रोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करून मदत द्या

संत्रा मृग बहाराचे देठ सुकी बुरशीजन्य रोगामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करून मदत द्या

शेतकऱ्यांचे अकोट तहसीलदार यांना निवेदन

अकोट

उमरा,पणज,आसेगाव,तिन्ही मंडळात मोठ्या प्रमाणात देठ सुखी या बुरशीजन्य

रोगामुळे फळाची मोठ्या प्रमाणात गळती झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Related News

तरी तातडीने आठ दिवसाच्या आत शेतीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी या करिता शिवसेना उध्दव

बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अकोट तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.अकोट तालुक्यातील उमरा,

अकोलखेड,पणज या मंडळातील संत्रा मृग बहाराचे देठ सुखी या बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

वेळेवर पाऊस न आल्यामुळे मृग बहार कमी प्रमाणात आलेला आहे.तसेच सतत नापीके

मुळे शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत आला आहे.तरी आपल्या कार्यालयामार्फत वरील रोगाची पाहणी करून आठ

दिवसाच्या आत तातडीने पंचनामे करण्यात यावे व संकटात पडलेल्या शेतकरी बांधवांना आर्थिक

नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीपभाऊ बोचे

तालुका प्रमुख ब्रम्हकुमार पांडे शिवदुत रमेश पाटील खिरकर मा उपशहरप्रमुख विजयभाऊ ढेपे

शिवसेना उमरा सर्कल संघटक ऋषीकेश लोणकर शिवसैनिक अंकुश कुलट प्रथमेश बोरोडे सचिन सोनोने सोपान

सोनोने संकेत वरणकार अपुल पडोळे ज्ञानेश्वर चोपडे जयकुमार आमणकर अंबादास रेके

शिवदास मुरेकर विशाल ठाकरे यावेळी शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.

Read more news here :https://ajinkyabharat.com/aurangzebachaya-samarthnavarun-abu-azhmivarvatan-thakkarya-shivaseneche-movement-akolid-poster/

 

Related News