संतोष देशमुख हत्या प्रकरणात क्रूरपणे मारहाण करतानाचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर
महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी अनेकांना अटक झाली असून मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
हा संपूर्ण घटनाक्रम, आरोपी, पुरावे आणि राजकीय आरोप प्रत्यारोपाची माहिती समोर आली आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे.
Related News
संतोष देशमुख यांची हत्या करताना, त्यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे अनेक व्हिडीओ, फोटो समोर आले.
या फोटोनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे.
या हत्येच्या कटात सहभाग असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे,
कृष्णा आंधळे हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे.
संतोष देशमुखांची निर्घृण हत्या करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानतंर आता धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
यामुळे आता संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग येईल, असे म्हटले जात आहे.
संतोष देशमुखांच्या हत्येपासून आतापर्यंत काय काय घडलं, याबद्दल आपण जाणून घेऊया
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची A टू Z अपडेट
💠28 मे 2024 – पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आले.
त्या बदल्यात 2 कोटी रुपयांची खंडणी द्या, अशी मागणी करण्यात आली.
जर तुम्हाला पुन्हा काम सुरू करायचे असेल तर पैसे द्या, असे सांगण्यात आले.
ही कंपनी पवनचक्की प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेणार होती.
💠6 डिसेंबर 2024 – सुदर्शन घुले यांच्या नेतृत्वाखाली काही लोक मस्साजोग गावात असलेल्या कंपनीच्या साईटवर पोहोचले.
या लोकांनी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांवर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला.
सरपंच संतोष देशमुख यांना याबद्दलची माहिती मिळताच ते देखील काही ग्रामस्थांसह घटनास्थळी पोहोचले.
यानंतर दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. यानंतर सुदर्शन घुलेला अटक करण्यात आली आणि यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली.
💠10 डिसेंबर 2024 – संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग गावातील लोकांनी हत्येचा
निषेध करण्यास सुरुवात केली. त्यांच्या मोर्चात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे,
सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी याला पाठिंबा दिला.
💠11 डिसेंबर 2024 – पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला.
💠संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार,
कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी म्हणजेच मकोका अंतर्गत या प्रकरणी सुमारे 1400 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून विशेष मकोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
💠बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरले.
याप्रकरणातील आका वाल्मीक कराड असून आकाच्या आकाचीदेखील चौकशी करायला हवी अशी ठाम भूमिका सुरेश धस यांनी घेतली.
💠तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील राखेचा व्यवहार,
वाल्मीक कराड ते धनंजय मुंडे कनेक्शन या सर्वांची कागदपत्रे समोर आणली.
💠यानंतर सातत्याने वाढणारा दबाव लक्षात घेता आरोपी वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले.
वाल्मिक कराड यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर खूप दबाव होता. कराड हे धनंजय मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
💠पोलिसांनी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांचीही चौकशी केली आहे.
सीआयडीने मंजिली कराड, त्यांचे दोन अंगरक्षक, अजित पवार गटाचे बीड जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेक लोकांविरुद्ध चौकशी केली आहे.
💠एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना दुसरीकडे भगवान गडाचे
महंत शास्त्री नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठींबा जाहीर केला. यामुळे नामदेव शास्त्रींवर टीका झाली.
💠त्यातच आता काही दिवसांपूर्वी म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 रोजी संतोष देशमुख हत्याप्रकरणी
विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली.
💠संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी बीडच्या विशेष मकोका कोर्टात वाल्मीक कराडसह 8 आरोपींच्या
विरोधात एक आरोप पत्र दाखल झाले. हे आरोपपत्र 1400 पानांचे आहे.
त्यामुळे या खंडणी प्रकरण आणि अपहरणाच्या प्रकरणात मोठे उलगडे आणि गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.
💠संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथून आरोपी पळून गेले होते.
त्यावेळी वाशी येथील पारा चौकातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे.
स्कॉर्पिओत एकूण सहा आरोपी होते. केज पोलीस आरोपींचा पाठलाग करत होते.
पोलिसांनी वाशी चौकात नाकाबंदीही केली होती. पोलीस पाठलाग करत असल्याची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले होते.
या घटनेचा 9 डिसेंबर 2024 चा संध्याकाळी 7 वाजून 10 मिनिटांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले.
💠ही घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णाण्यात नेण्याऐवजी PSI
राजेश पाटील यांनी कळंबकडे कोणाच्या सांगण्यावरून वळवला याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
💠सरपंच देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी यासंदर्भात आरोपपत्र दाखल करुन यात वाल्मिक कराडच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी असल्याचे समोर आले.
5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर वाल्मिक कराडविरुद्ध पुरावे मिळाले.
💠संतोष देशमुख यांच्या हत्येचे आणि त्यांना मारहाण करतानाचे 8 फोटो आणि 15 व्हिडीओ समोर आले.
महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम या फोटोतून उलगडला आहे.
या हत्यावेळेचे सर्व व्हिडीओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहेत.
💠यात जयराम चाटे हा संतोष देशमुख यांची पँट काढताना दिसत आहे.
तर आरोपी महेश केदार हा त्या दृष्याचे सेल्फी घेत हैवानासारखा हसताना दिसत आहे.
तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झाले, तेव्हा प्रतिक घुले देशमुखांच्या छातीच्या
दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो. जयराम चाटे देशमुखांच्या अंगावर शर्ट ओरबाडून काढतो.
काढलेला शर्ट हातात धरुन हसतो. यानंतर मारेकरी पाईप आणि वायरने देशमुखांवर वार करतात.
लाथा-बुक्क्यांनी मारहाण शिवीगाळ होते, असे सर्व फोटो समोर आले आहेत.
Read more news here :https://ajinkyabharat.com/dhananjay-munde-yanchaya-niwashanabaher-settlement-vadhwala/