Santosh Deshmukh Case: आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांना स्वतःच्या मोबाईलमध्ये दोन तास अमानुष मारहाण करताना तब्बल 15 व्हिडीओ आणि 8 फोटो घेतले होते. हा सर्व डेटा पोलिसांच्या हाती लागला आहे, तो न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली, या घटनेने राज्यातील राजकारण देखील मोठ्या प्रमाणावर तापलं.
या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप प्रत्यारोप झाले, त्यानंतर आता या प्रकरणात मोठे खुलासे समोर येत आहेत.
Related News
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिशादर्शन :
लज्जास्पद! छत्तीसगडमध्ये सख्ख्या भावाकडून दोन वर्ष बहिणीवर बलात्कार;
समस्तीपूरमध्ये सात लाखांची लूट, दोन भावांवर गोळीबार;
IPL 2025 : प्लेऑफसाठी ‘करो या मरो’ सामना, मुंबई विरुद्ध दिल्ली…
ई-पासपोर्टची सुरुवात भारतात : प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार,
मुंबई विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आग, शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती
संभळ जामा मशिदीच्या सर्वे प्रकरणात मुस्लिम पक्षाला झटका;
भारतभरात पाकिस्तानसाठी काम करणारे गुप्तहेर उघड!
‘जासूस’ ज्योती मल्होत्रा प्रकरणात नवा खुलासा!
‘ऑपरेशन सिंदूर’ प्रतिनिधिमंडळापासून ममता यांची तुटवड;
Jammu-Kashmir: शोपियांमध्ये दहशतवाद्यांच्या दोन साथीदारांना अटक:
उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर;
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे व महेश केदार यांनी दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी हत्या कशा पद्धतीने केली याची देखील माहिती त्यांनी दिली आहे.(Santosh Deshmukh case)
देशमुखांच्या हत्येच्या वेळी वापरलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून 19 पुरावे पोलिसांना मिळालेले आहेत.
या कारच्या दरवाजाच्या काचेवर असलेले सुधीर सांगळेचे ठसे फॉरेन्सिक तपासणीत मॅच झाले आहेत.
सुदर्शन घुले याची ही गाडी असून, त्याच गाडीतून आरोपी वाशीपर्यंत गेले होते. तेथे ही गाडी सोडून आरोपी जंगलाच्या दिशेने पळत गेले.
ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गाडीची संपूर्ण तपासणी पोलिस, फॉरेन्सिक लॅबमार्फत करण्यात आली होती. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात काही बाबी समोर आल्या आहेत.
गाडीमधील फिंगरप्रिंटस् आणि इतर काही पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत. या गाडीत मिळालेले फिंगरप्रिंटस्चे ठसे सुधीर ज्ञानोबा सांगळे या आरोपीचे आहेत, असा अहवाल फिंगरप्रिंट ब्यूरोने दिला आहे.