संतश्री वासुदेव महाराज यांच्या मातोश्री चंद्रभागा देवी यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

संतश्री वासुदेव महाराज यांच्या मातोश्री चंद्रभागा देवी यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

अकोट

संतश्री वासुदेवजी महाराज यांच्या मातोश्री चंद्रभागादेवी पुंडलिकरावजी जायले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सालाबाद

प्रमाणे जो उत्सव श्री संत भास्कर महाराज संस्थान भास्कर नगर आडगाव बुद्रुक या ठिकाणी संपन्न होत होता.

Related News

परंतु कोरोना कालखंडामध्ये तो शासकीय नियमानुसार बंद पडला असतांना काही निष्ठावंत गुरु भक्तांच्या माध्यमातून

श्रींचेकुलोत्पन्न श्रीयुत अशोक महाराज जायले यांच्या कुशलनेतृत्वात श्री वैष्णव ज्ञान मंदिर वडाळी सटवाई या ठिकाणी अखंडपणे चालू ठेवल्या गेला.

गतवर्षी पासून तो सार्वजनिक स्वरूपात आयोजित करण्यात येतो आहे.

याहीवर्षी आषाढ वद्य अष्टमी दि. १८/७/२०२५ शुक्रवार रोजी सकाळी प्रथम श्रींच्या मूर्तीचा यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे अभिषेक होणार आहे .

सकाळी १० ते १२ यावेळी हभप भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ त्यांचे हरिकीर्तन होऊन भव्य प्रमाणामध्ये

महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचावन्न वर्षाची पुरातन परंपरा असणाऱ्या उपरोक्त कार्यक्रमाकरिता पंचक्रोशीतील

संपूर्ण श्रीगुरु भक्तांनी उपस्थित राहून श्रींच्या मातोश्रींच्या चरण कमली आपले श्रद्धा सुमन

समर्पित करण्याचे आवाहन श्री संत भास्कर महाराज भक्त मंडळ अकोट यांनी केले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/gomas-vikar-karanaaryavar-muthi-action/

Related News