संत रविदास ऐतिहासिक प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्षपदी प्रा. डॉ. गणेश बोरकर

ऐतिहासिक

अकोला – शासकीय विश्रामगृह-सभागृहात अकोला जिल्ह्यातील चर्मकार समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत समाजाच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून अकोला शहरात भव्यदिव्य संत रविदास ऐतिहासिक प्रतिष्ठाण उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.या प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षपदी सर्वानुमते प्रा. डॉ. गणेश बोरकर यांची निवड करण्यात आली. समाजातील अनुभवी व सक्षम व्यक्ती पुढाकार घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली होती. त्यावर सर्वांच्या सहमतीने बोरकर यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.शिक्षण, आरोग्य आणि युवकांना रोजगार या क्षेत्रांसह अद्यावत रुग्णालय उभारून समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती प्रा. डॉ. गणेश बोरकर यांनी दिली. यासाठी शहरालगत जमीन खरेदी करण्याचे प्रथम लक्ष्य निश्चित करण्यात आले असून ते येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.बैठकीला सेवानिवृत्त कर्नल पाडुरंग वाडेकर, गजानन भटकर, प्रविण चोपडे, प्रशांत भटकर, मधुकर वानेटकर, रामाभाऊ उंबरकर, संज्योती मांगे, छाया इंगळे, कविता बुंदे, शिवलाल इंगळे, योगेश इंगळे, आशाताई चिम, नंदकिशोर ढाकरे, सुनील गवई, प्रतिभा शिरभाते, गजानन वझिरे, वर्षा वझिरे, वनिता गवई, पिके रेवस्कर, कोमल तायडे, सतीश अस्वारे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम पानझाडे, वंदना कांबळे, अमोल वानखडे, निरंजन गव्हाळे, श्रीराम राखांडे, विजय भटकर, गजानन काकडे, मुरलीधर इंगळे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण चोपडे यांनी केले तर आभार प्रशांत भटकर यांनी मानले.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/telhara-municipal-council-office-2/