संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘फुल कॅरी ऑन’ लागू; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
अकोला – अकोलाच्या रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या मागणीची दखल घेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी तिसऱ्यांदा ‘फुल कॅरी ऑन’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे फार्मसी, विधी, शिक्षणशास्त्र, समाजकार्य, स्थापत्यशास्त्र आदी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना विना अट पुढील वर्षात प्रवेश मिळणार असून, विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अकोला जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
अखेर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून ही ऐतिहासिक मागणी मान्य केली.
परिषदेच्या वतीने दोन्ही पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले असून, या निर्णयामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून अनेक विद्यार्थ्यांची सुटका झाली आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/akolidya-unnatural-mazur-sangatneche-district-magistrate-office/