लाडकी बहीण योजनेबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा

दोन महिन्यांनी

दोन महिन्यांनी पैसे मिळणार नसल्याचं वक्तव्य

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे.

आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनी

Related News

लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, असे वक्तव्य ठाकरे गटाचे

खासदार संजय राऊत यांनी केले. महायुती सरकार राज्यावर

कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल.

लाडक्या बहीण योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जात आहे.

पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांकडे ठेकेदार

आणि जनतेकडून लुटलेले पैसे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

ते शुक्रवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर आगपाखड केली.

दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

नव्या संसदेतही पाणी शिरले होते. या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले.

नवी संसद आणि अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला एक वर्षच पूर्ण झाले आहे.

तरीही याठिकाणी पावसाळ्यात पाणी गळत आहे.

त्यामुळे या दोन्ही कामांसाठी भाजप सरकारने ठेकेदरांना किती पैसे दिले,

या सगळ्यातून कमिशन कोणाला मिळालं? याची चौकशी झाली पाहिजे.

राम मंदिराचं काम लार्सन अँड टुब्रो आणि दिल्लीतील नव्या संसदेचं काम टाटांनी केले.

पण या कामाची इतर कंत्राटं कोणाला देण्यात आली होती,

याची चौकशी झाली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Read also: https://ajinkyabharat.com/supreme-court-refuses-to-intervene-in-sambhajinagar-dharashiv-renaming-case/

Related News