मुंबई – आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर आणि भाजपच्या देशभक्तीच्या वागणुकीवर थेट सवाल उभे केले आहेत.
संजय राऊतांचा आरोप – क्रिकेट सामना म्हणजे दहशतवाद्यांना आर्थिक मदत!
रविवारी दुबईत भारत-पाकिस्तान टी-२० सामना पार पडला, ज्यात भारताने पाकिस्तानला ७ गडी राखून पराभूत केले. परंतु संजय राऊत यांनी हा सामना दहशतवाद्यांना आर्थिक मदतीसारखा ठरल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून केला.
“निर्लज्जपणाचा कळस गाठून दुबईत सामना खेळण्यात आला. महाराष्ट्रासह भारतात या सामन्याचा बहिष्कार होण्याची स्थिती होती. तरीही भाजप सरकारने दारे-खिडक्या बंद करून सामना पाहिला,” असे त्यांनी नमूद केले.
जय शहा यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह
संजय राऊत यांनी बीसीसीआय अध्यक्षपदी जय शहा यांच्या नियुक्तीवर देखील प्रश्न उपस्थित केले.
“अमित शहांनी आपला पुत्र जय शहा यांना बीसीसीआय अध्यक्षपदी कोणत्या गुणवत्तेच्या आधारावर नेमले? क्रिकेटमध्ये जुगार आणि सट्टेबाजीचा पैसा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हे नेमणूक फक्त व्यापारासाठी झालेली आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
🇮🇳 देशभक्तीची भूमिका विसंगत?
संजय राऊत यांनी भाजपवर थेट आरोप करत म्हटले,
“एका बाजूला पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात प्रवेश नाही, तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट संघाबरोबर सामना खेळला जातो. भाजपची भूमिका दुतोंड्या गांडुळासारखी आहे.”
त्यांनी अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचे उदाहरण देत सांगितले, “जेव्हा देशाचा अपमान होतो, तेव्हा फुटबॉल संघ मैदानातून बाहेर पडतो, पण आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो.”
‘फिक्सिंग’ विजय आणि दहशतवादासाठी पैसे?
संजय राऊत यांनी पुढे सांगितले,
“हा विजय फिक्सिंग आहे. भारतीय सैन्य आणि पुलवामा, पहलगाममधील शहीदांचा अपमान आहे. दुबईतील सामन्यातून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कोटी कोटी रुपये कमावले. हे पैसे दहशतवाद्यांच्या कारवायांसाठी वापरले जातील.”
संजय राऊत म्हणाले की, या सामन्यातील सट्टेबाजीचे पैसे थेट दहशतवाद्यांना पोचत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळातही देशभक्तीचे मूल्य आणि नैतिकता जपणे अत्यंत आवश्यक आहे. अशा विषयांवर खुलासा होणे आणि जनजागृती करणे ही समाजाची जबाबदारी आहे.
read also :https://ajinkyabharat.com/lokana-wattam-meich-hai-banana-ahe/