संजय मंडलिकांचा मुलगा विधानसभेच्या रिंगणात

कोल्हापुरातील कागल विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार

संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी विधानसभा

निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. नुकत्याच

Related News

आयोजित केलेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्ता पदाधिकारी

मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांनी घोषणा केली. यामुळे महायुतीत

तिढा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक

यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर मंडलिक गटाच्या

कार्यकर्त्यांनी याचे खापर महायुतीतील नेते पालकमंत्री हसन

मुश्रीफ आणि तत्कालीन भाजप नेते समरजीत घाटगे यांच्या

कार्यकर्त्यांवर फोडले होते. याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंडलिक गटाने स्वतंत्र मेळावा

आयोजित केला होता. या मेळाव्याला शिवसेना एकनाथ शिंदे

गटातील जिल्ह्यातील आमदार पदाधिकारी उपस्थित होते. माजी

खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश

क्षीरसागर, आमदार प्रकाश अबिटकर, वीरेंद्र मंडलिक यांच्यासह

121 गावांमधील मंडलिक गट आणि शिवसैनिक या मेळाव्यासाठी

होते.

Read also: https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-delhit-kadhanar-nyay-yatra/

Related News