संजय गांधी निराधार योजना ही एक शासकीय योजना आहे, ज्यामध्ये निराधार लोकांना आर्थिक मदत दिली जाते.
याचा लाभ निराधार, अपंग, विधवा आणि इतर गरजू लोकांसाठी आहे. त्यांना दरमहा ठराविक रक्कम दिली जाते.
मात्र, अकोला जिल्ह्यात या योजनेत भोंगळ कारभार असल्याची माहिती समोर येत आहे. यात अनियमितता, दिरंगाई,
आणि गैरव्यवहार अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय तहसील कार्यालय अंतर्गत येत.
असून संबंधित अधिकारी लाभार्थी रांगेत उभे असताना मधातच काम सोडून निघून जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अधीकारी पैसे खात्यात जमा झाले असे सांगून किंवा इतर कारणे सांगून लाभार्थ्यांना परत पाठविल्या जात आहे,
वयवृद्ध लाभार्थ्यांना विनाकारण कार्यालयामध्ये पायपीट होत आहे. तसेच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी जास्त पैसे किंवा इतर गोष्टींची मागणी केली जाते.
काही लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर होण्यास खूप वेळ लागतो तर काही लाभार्थ्यांना योजनेचे पैसे वेळेवर मिळत नाहीत, अशा विविध तक्रारी प्राप्त झाले आहेत.
तरी संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.