संजय दत्तने वाढदिवसानिमित्त नवीन चित्रपटाची केली घोषणा

बॉलिवूड अभिनेता

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने २९ जुलै रोजी त्याचा

६५ वा वाढदिवस साजरा केला.

या अभिनेत्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related News

पत्नी मान्यताने त्यांना इंस्टाग्रामवर प्रेमाने शुभेच्छा दिल्या आहेत.

आणि आता याचदरम्यान अभिनेत्या त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

संजय दत्त यांनी स्वतः त्यांच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पुन्हा एकदा हा अभिनेता साऊथ चत्रपटात दिसणार आहे

तो शेवटचा लिओ या चित्रपटात दिसला होता आणि आता तो लवकरच

‘केडी’ द डेव्हिल’मध्ये दिसणार आहे. त्यांचा हा पोस्टरमधून शेअर केलेला लुक पाहून

चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त,

अभिनेत्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘केडी द डेव्हिल’ ची घोषणा करण्यासाठी

त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर देखील शेअर केला.

या चित्रपटात तो ‘धक देवा’ची भूमिका साकारणार आहे.

हे दमदार पोस्टर शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की,

“दैत्य लोकशाहीचा देव, धक देवा, केडीच्या विंटेज रणांगणात उतरला आहे

आणि आता वादळ निर्माण करण्याची त्याची पाळी आहे.”

असे लिहून त्यांनी हे चाहत्यांना थक्क केले आहे.

या पोस्टरमध्ये अभिनेता विंटेज कारसमोर उभा आहे, डोक्यावर पोलिसांची टोपी,

हातात लाल काठी, गळ्यात पोलिसांचा पट्टा, बिबट्या प्रिंटचा शर्ट, त्यावर डेनिम जॅकेट,

खाली काळी लुंगी, बूट घातले आहेत. त्याचे पाय, मोठे केस आणि तो दाढी,

डोळ्यांवर चष्मा आणि कपाळावर टिळक घातलेला या पोस्टरमध्ये दिसत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/scheme-worth-lakhs-of-rupees-for-farmers-district-agriculture-departments-15th-august-meeting/

Related News