अकोला महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा एकल उपयोग प्लास्टिक व थर्माकॉल विरोधात तपास मोहीम

अकोला महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा एकल उपयोग प्लास्टिक व थर्माकॉल विरोधात तपास मोहीम

शासनाने बंदी घातलेले एकल उपयोग प्लास्टिक, थर्माकॉल आणि प्लास्टिक कोटींग असलेले डिस्पोजेबल वस्तू, कप, प्लेट्स, ग्लासेस,

चायनीज व प्लास्टिक मांजाचे उत्पादन, वापर, विक्री व वाहतूक यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अकोला

महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने आज शहरात झोन निहाय तपासणी मोहीम राबवली.

Related News

या तपासणी मोहिमेदरम्यान, टिळक रोड येथील अलंकार मार्केटमध्ये एका व्यावसायिकाकडे प्रतिबंधीत डिस्पोजेबल ग्‍लासचा

मोठा साठा आढळला. त्याच्यावर ५,००० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्याचा साठा जप्त केला गेला.

तसेच, रतनलाल प्‍लॉट येथील दोन व्यावसायिकांकडे प्रतिबंधीत कॅरीबॅग्सचा साठा आढळला. त्यांच्यावर देखील ५,००० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली

आणि त्यांचा साठा जप्त केला गेला.

या कारवाईमुळे एकल उपयोग प्लास्टिकच्या वापरावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे.

अकोला महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या या मोहिमेने पर्यावरणीय उपाययोजनांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/celebrating-krantijyoti-savitribai-phule-jayanti-and-girls-day/

Related News