राष्ट्रीय समाज पक्षाच्या कडून सध्या संघटनेवर भर दिला जातो. आज अकोल्यात समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी
एका बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांकडून संघटन बांधणीचा आढावा घेतला. दरम्यान समाजवादी पक्षाच्या निवडणुका या आप आपल्या ताकदीवर लढवल्या जातील.
महाविकास आघाडीने जागा दिल्या तर त्यांच्यासोबत जायला तयार आहे.
मात्र पुन्हा एनडीएचे सरकार राज्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करणार आहे.
समाजवादी पक्ष आपल्या ताकतीवर कशा जास्त जागा जिंकेल याचा प्रयत्न संघटन बांधणीतुन केल्या जाणार आहे.
दरम्यान संविधान बदलावे जावे का..? या शिवाजी कोकणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकावर जोरदार प्रतिवार केला.
संविधान आहे म्हणूनच मी इंजिनियर झालो. एवढंच जर असेल तर ईव्हीएम मशीन बाजूला ठेवावी आणि मग निवडणूक लढावी असं ओपनिंग चॅलेंज त्यांनी संविधान बदलून पाहणाऱ्यांना दिले.