संगीता जाधव यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 ने सन्मानित

अकोला जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्राची गौरवस्तंभ

बार्शीटाकळी  – अकोला जिल्हा आरोग्य विभागातील आरोग्य सेवा क्षेत्रातील कर्तृत्ववान महिला व महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष संगीता ताई जाधव यांना नॅशनल आयकॉन अवॉर्ड 2025 देऊन मलकापूर येथे सन्मानित करण्यात आले.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संगीता जाधव यांचे विशेष योगदान दृष्टीस आणून त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दैनिक कर्णधार वृत्तपत्राच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक दिन व वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी नॅशनल आयकॉन अवॉर्ड चे आयोजन केले जाते. पत्रकारिता, शिक्षण, साहित्य, सामाजिक कार्य, खेळ, राजकीय, कला, आरोग्य सेवा, महिला नेतृत्व, सहकार, पतसंस्था अशा अनेक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराद्वारे सन्मानित केले जाते.

अकोला जिल्ह्यातील पातुर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत संगीता ताई जाधव यांनी आरोग्य सेवा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार प्रदान केला गेला. 11 सप्टेंबर 2025 रोजी मलकापूर येथील भातृ मंडळ हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते संगीता जाधव यांना हा गौरव प्रदान करण्यात आला.

संगीता जाधव यांचे कार्य आरोग्य सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले असून, या पुरस्कारामुळे त्यांच्या समाजसेवेची दखल घेण्यात आली आहे.

read also :https://ajinkyabharat.com/kunika-jhishan-kadarisok-tisam-lagna-karanar/