“फॅशन म्हणजे फक्त कपडे नव्हे, तर व्यक्तिमत्त्वाला खुलवणारा एक आत्मविश्वास असतो .
अकोला जिल्ह्यातील नावाजलेल्या फॅशन डिझायनर स्नेहल भरणे तराळे यांनी या आत्मविश्वासाला नवे वळण दिले.घरातून सुरू झालेला संघर्षमय प्रवास आज ‘स्नेहश्री फॅशन हब ’ या नावाने उभा आहे.
फ्युजन स्टाईलपासून ग्लॅमरस सेलिब्रिटी पोशाखांपर्यंत प्रत्येक डिझाईनमध्ये वेगळेपण आणि कला दिसते.मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील शशांक केतकर, किशोरी शहाणे, सोनाली कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या डिझाईन्स परिधान केल्या.त्यांची कला विदर्भापुरती मर्यादित न राहता पुणे-मुंबईपर्यंत पोहोचली आहे.ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी व्यासपीठ निर्माण करणे, त्यांच्या कलागुणांना संधी देणे हेच त्यांच्या खऱ्या यशाचं मोल आहे.चला जाणून घेऊया स्नेहल भरणे तराळे यांची संघर्षातून घडवलेली फॅशनची प्रेरणादायी दुनिया !
संघर्षातून घडलेली फॅशनची दुनिया

30
Sep