आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांची मोठी घोषणा 

महाराष्ट्रात एका नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला आहे. विशेष

म्हणजे या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली असून

चिन्हंदेखील ठरलं आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय

Related News

पक्षाचे नाव महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे आहे. हा पक्ष दुसऱ्या

तिसऱ्या कोणाचा नसून माजी खासदार छत्रपती संभाजीराजे

भोसले यांचा आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी नुकतंच फेसबुकवर

एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी याबद्दल संपूर्ण

माहिती दिली आहे. तसेच या पोस्टद्वारे संभाजीराजेंनी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचेही

पाहायला मिळत आहे. दरम्यान आगामी विधानसभा

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ही मोठी

घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काही महिन्यांपूर्वी

स्वराज्य संघटना स्थापन केली होती. आता संभाजीराजे यांनी

निवडणूक आयोगाकडे त्यांच्या पक्षाची अधिकृतरित्या नोंदणी

केली आहे. “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” असे त्यांच्या पक्षाचे नाव

असणार आहे. तसेच सप्तकिरणांसह पेनाची निब असे त्यांचे

निवडणुकीचे चिन्ह असणार आहे. या पोस्टद्वारे त्यांनी ते आगामी

निवडणूक लढवणार असल्याबद्दलही घोषणा केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/murtijapurat-poetry-kalash-kavi-sammelanala-record-break-gardi/

Related News