सामंत बंधूंना राजन साळवी नको होते, शिंदे सेनेत दोन गट पडले; ठाकरेंच्या नेत्याचा मोठा दावा

सामंत बंधूंना राजन साळवी नको होते, शिंदे सेनेत दोन गट पडले; ठाकरेंच्या नेत्याचा मोठा दावा

राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाला सामंत बंधूंचा नकार होता.

त्यांना राजन साळवी नको होते. तरी शिंदेंनी साळवींना सेनेत घेतलं,

असा दावा विनायक राऊतांनी केला आहे

प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणाचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेचे

मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते

माजी खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

Related News

शिंदे सेनेत उद्योग मंत्री उदय सामंत यांना राजन साळवी नको होते शिंदे सेनेत एकनाथ शिंदे विरुद्ध उदय सामंत असे

तुंबळ शीतयुद्ध तिकडे सुरू आहे त्यामुळे शिंदे सेनेत दोन गट पडले आहेत का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

विनायक राऊत यांनी जोरदार टीका राऊत यांनी करताना हा मोठा दावा केला आहे.

राजन साळवी यांचा थेट प्रवेश एकनाथ शिंदे यांनी केला. पण, राजन साळवी सामंत बंधूंना नको होते.

तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुंबईमध्ये बोलवून त्यांचा प्रवेश करून घेतला. त्या एकनाथ शिंदेंना माझी रत्नागिरीमध्ये ताकद किती आहे.

राजकारणामध्ये जर का मला डावललात तर तर किती भारी पडेल हे दाखविण्यासाठी

उदय सामंत यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती झालेल्या सभेत रत्नागिरी येथे शक्तिप्रदर्शन केलं आहे, असाही दावा विनायक राऊत यांनी केला आहे.

Read more here

https://ajinkyabharat.com/chengrachengarichya-ghatnela-migrant/

Related News