जनुना (ता. मेहकर) येथे बिरसा क्रांती दल व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य आदिवासी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बिरसा क्रांती दलाचे राज्याध्यक्ष डी.बी. अंबुरे उपस्थित होते. त्यांच्या भव्य सत्कारानंतर विविध मान्यवरांनी समाजातील प्रश्नांवर मार्गदर्शन केले.यावेळी बिरसा क्रांती दल महिला फोरमच्या अध्यक्षा सौ. कार्तिका संतोष ठाकरे यांनी महिलांना प्रबोधन करताना सांगितले की,“आदिवासी समाजातील महिला कणखर आहेत. आज अनेक संकटे समाजावर आली असून गैरआदिवासी जातीचे काही समूह अनुसूची जमातीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे चुकीचे असून अनुसूचित जमातीत फक्त ठरावीक निकष पूर्ण करणाऱ्यांनाच समाविष्ट करता येते. महाराष्ट्रातील कोणतीही जात हे निकष पूर्ण करत नाही.”त्यांनी पुढे असेही मत व्यक्त केले की,
“हा आवाज महिलांनी घराघरात पोहोचवायला हवा. इतिहासात अनेक महिलांनी देशासाठी आंदोलने केली, बलिदान दिले. आज पुन्हा आमच्या महिलांना रणांगणात उतरण्याची तयारी करावी लागेल. तसेच आमच्या तरुण-तरुणींना या समाजपरिवर्तनाच्या लढाईत सामील होण्यासाठी सज्ज केले पाहिजे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नारायणराव पिल्लवंड (राज्याध्यक्ष – बिरसा क्रांती दल व्हॅलेंटियर फोर्स), जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भास्करराव ठाकरे, विभागीय अध्यक्ष संतोष ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुधाकर पांडे, जिल्हा सचिव नवनाथ पवार, आयटी सेल प्रमुख रामेश्वर डाखोरे आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित राहिले.कार्यक्रमाचे संचालन सुधाकर पांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रदीप खिल्लारे यांनी मानले.
read also:https://ajinkyabharat.com/navratriotsavat-bhavikanchi-mandiai/
