सलील देशमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला! 

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल

देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी आज शिवसेना उबाठा

गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरे

Related News

हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर जिल्ह्यातील

कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूप पुतळ्यांचे

ते आज अनावरण करणार आहेत. त्यानंतर ते नागपूर जिल्ह्यासह

विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहे.

दरम्यान, आज उद्धव ठाकरे यांचा मुक्काम नागपुरातील हॉटेल

रेडिसन येथे आहे. यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी सलील देशमुख

पोहचले आहे. अनिल देशमुख हे काटोल विधानसभा सोडायला

तयार नसल्याने सलील देखमुख हे पर्यायी मतदार संघाच्या शोधात

आहे . त्यामुळे सलील देशमुख यांच्या पर्यायी मतदारसंघाला घेऊन

नागपूर जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. परिणामी, त्या

पार्श्वभूमीवर सलील देशमुख यांची उद्धव ठाकरे यांच्याशी झालेली

भेट महत्वाची मनाली जात आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/manoj-jaranges-second-fair-to-be-held/

Related News