साखर डोह : वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थिनींना सायकलचे वाटप

साखर डोह : वसंतराव नाईक विद्यालयात विद्यार्थिनींना सायकलचे वाटप

साखर डोह (प्रतिनिधी)

येथील वसंतराव नाईक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता आठवीतील

विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.

गुरुवार, दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. यू.

आसोले यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.

या योजनेतून गौरी किसन वाघमारे, अर्चना संजय शिंदे, कोमल स्वामी शेलकर, मुस्कान रफिक खान,

साक्षी अरुण ससाने आणि पल्लवी सुनील मिरासे या सहा विद्यार्थिनींना सायकल देण्यात आल्या.

कार्यक्रमाला विद्यार्थिनींचे पालक, सहाय्यक शिक्षक सतीश राठोड, शिपाई डी. पी. राऊत,

जी. के. धोंगडे, तसेच गावातील प्रमुख नागरिकांची उपस्थिती होती.

मुख्याध्यापक आसोले सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Read Also :  https://ajinkyabharat.com/akolidayat-ganeshotsav-pahltayarin-gati-public-mandalachi-districts/