खामगाव हॉटेल जुगनू मध्ये प्रेमी युगलाचा संशयास्पद मृत्यू ?

प्रेमी युगलाचा संशयास्पद मृत्यू, खून की आत्महत्या ?

खामगाव : सजनपुरी नाक्यावर हॉटेल जुगनू मध्ये प्रेमी युगलाचा  संशयास्पद मृत्यू, खून की आत्महत्या?

खामगाव (प्रतिनिधी) : खामगाव शहरातील सजनपुरी नाक्यावर असलेल्या हॉटेल जुगनू येथे एका प्रेमी युगलाचा मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार आज मंगळवारी संध्याकाळी 8 वाजे दरम्यान उघडकीस आला असून, नेमका मृत्यूचे  स्वरूप खून आहे की आत्महत्या, याबाबत गुढ कायम आहे. प्राथमिक माहिती नुसार दोन्हीही युवक-युवती साखरखेर्डा गावातील असल्याचे  समजते तसेच युवकाचे वय अंदाजे पंचवीस वर्ष तर युवतिचे वय अंदाजे बावीस वर्ष असल्याचे समजते .घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपासाची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.मृत युवक व युवती बाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक तपास सुरू असून मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांचा पंचनामा सुरू आहे. घटनेमागील कारण उलगडण्यासाठी पोलिसांकडून चौकशी जोरात सुरू आहे.दरम्यान, हॉटेलमध्ये घडलेल्या या संशयास्पद मृत्यूबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात असून, नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. पोलीस प्रशासनाने संयम बाळगण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/tya-naradham-teacherla-fashi-danyachi-magani/

Related News

Related News