आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे निघालेली संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीच
आज पहाटेच अकोला शहरात आगमन झाले..” श्री”ची पालखी ही दोन दिवस अकोला शहरात मुक्कामी राहणार आहे.
शहरातील विविध मार्गावरून ही पालखी निघणार आहे.. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अकोला शहरातील
Related News
असंख्य भाविक आज सकाळपासूनच रस्त्यावर दिसून आले.
महिला भगिनींनी गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर सुरेख अशा छान रांगोळ्या काढल्या होत्या.
या दरम्यान, पालखी सोहळ्यात एकूण सातशे वारकरी असून पालखीचे यंदा वर्ष 56 आहे
आज सायंकाळी श्री संत गजानन महाराजांची पालखी अकोला शहरातील मुंगीलाल बाजोरिया
येथे मुक्कामी राहिला असून या ठिकाणी लाखो भक्त दर्शनासाठी दाखल होणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatiyal-akot-talukyastha-vastapur-yehet-karma-killing/
