संत ज्ञानेश्वर महाराज ७५०वी जयंती वर्षानिमित्त राधाबाई गणगणे विद्यालयात सामुदायिक पसायदान गायन
मुंडगाव – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशत्कोत्तर (७५०वी) जयंती वर्षानिमित्त राधाबाई गणगणे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सामुदायिक पसायदान गायनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य देवेंद्र सोनटक्के होते.
यावेळी प्रा. शंकर गवई यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे कार्य, कवित्व आणि पसायदानाचा शब्दशः अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
त्यानंतर विनोद रसे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक, विद्यार्थी आणि गावकरी यांनी एका सुरात पसायदानाचे गायन केले.
कार्यक्रमात माणिक राठोड, राजेंद्र मुऱ्हेकर, आनंद चंदनकर, दिगंबर घुगे आणि निलेश देशमुख यांनी प्रमुख सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/akot-municipality/
