हम्बर्टो वादळाने अमेरिकेत धोकादायक परिस्थिती निर्माण केली, तर इमेल्डा वादळही वाटेत; भारतासाठी काही धोका नाही. सध्या एका वादळाचा धोका संपलेला नसताना, दुसरे वादळही समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने येत आहे. या नव्या वादळाचे नाव इमेल्डा असून, तज्ज्ञांच्या मते याचा अमेरिका आणि कॅरेबियन समुद्रकिनाऱ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. सध्या अटलांटिक महासागरात हम्बर्टो वादळ उठले असून त्याला श्रेणी ५ मध्ये ठेवण्यात आले आहे. या श्रेणीतील वादळ अत्यंत भीषण मानले जाते आणि 225 किमी प्रतितासाच्या वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे अमेरिकेच्या प्रशासनाने लोकांना सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार इमेल्डा वादळ दक्षिण-पूर्व अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने सरकत आहे. तज्ज्ञांनी या वादळाला उष्णकटिबंधीय चक्रीवादळ म्हणून वर्णन केले आहे. बहामास, क्यूबा आणि फ्लोरिडा भागात या वादळामुळे पूर, मुसळधार पाऊस आणि समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. तथापि, हवामान विभागाने सांगितले की, इमेल्डा वादळाचा वेग दक्षिण कॅरोलिनावर येईपर्यंत कमी होईल, ज्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. मात्र समुद्रकिनाऱ्यावर पावसामुळे पूर येऊ शकतो. सध्या भारतावर या वादळाचा काहीही धोका नाही. त्यामुळे नागरिकांनी चिंता न करता, परिस्थितीवर लक्ष ठेवावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
read also:https://ajinkyabharat.com/havaman-department-red-alert-issued/