लोणार प्रतिनिधि
महाराष्ट्रातील नामवंत,कीर्तीवंतआणि शिस्तीचे पालन करते म्हणून ओळखले जाणारे शेगाव येथील
श्री संत गजानन महाराज संस्थान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये ज्या संस्थांनने एक आगळीवेगळी ओळख तयार करून नावलौकिक केले आहे.
अनंत भक्तांची ज्यांच्यावर भक्ती आहे असे शेगाव येथील श्री संत गजानन महाराज त्यांच्या आशीर्वादाने अनेक
भक्तांना ऊर्जा मिळते असे सर्वांचे श्रद्धास्थान श्री संत गजानन महाराज आणि या संस्थांनचि शेगाव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते शेगाव अशी पाई मार्गाने चालत
असणारी दिंडिचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज आगमन झाले आहे.
तर उद्या म्हणजेच दि.24 जुलै रोजी या दिंडीचे लोणार तालुक्यामध्ये बीबी या गावि आगमन होणार आहे.
आणि दिनांक 25 जुलै रोजी लोणार येथे दिंडीचे आगमन होऊन दि.26 जुलै रोजि लोणार वरून मेहकर ला पालखी मार्गस्थ होणार आहे.
तरी लोणार तालुक्यातील सर्व वारकरी संघटनेसह वारकरी भक्तांनी या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी
आपल्या गणवेशामध्ये सहभाग घेऊन व शिस्तीचे पालन करून सेवा करावी.
अशी विनंती वारकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष ह.भ.प.रामदास महाराज धांडे यांनी केली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/trust-yethil-patti-wife-garfas-ghet-apli-jivanya-sampavili/