मुंबई: अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने अनेक वर्षांची मौनधारणा मोडत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत अफेअरच्या अफवांवर स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे. शिल्पा सध्या बिग बॉस १८ मध्ये दिसत आहे आणि एका मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले.शिल्पा म्हणते, “माझा चुलत भाऊ आणि सचिन एकत्र क्रिकेट खेळायचे. माझा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता, मी सचिनला भेटायला उत्सुक होते. एकदा तो माझ्या भावाच्या घरी आला आणि मी तिथे होतो. पण अफेअरच्या चर्चा कुठून सुरू झाल्या, मला माहित नाही. लोक अजूनही या अफवांबाबत विचारतात, पण आमच्यात काहीही खास नव्हतं. त्यानंतर मी पुन्हा सचिनला भेटले नाही.”शिल्पाने तिच्या पर्सनल लाइफसह प्रोफेशनल लाइफबाबतही खुलासा केला. आगामी काळात ती अनेक चित्रपट आणि शोजमध्ये दिसणार आहे.या खुलाश्यानंतर चाहत्यांमध्ये शिल्पा-तेंडुलकर अफवांबाबतची गमतीदार चर्चा पुन्हा एकदा ताजी झाली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/indian-it-professionals/
