“सरकार मदत करणार की शेतकऱ्यांचे बलिदान ? याकडे सर्वांचे लक्ष्य

शेतकऱ्यांचे

 198 शेतकऱ्यांचा जलसमाधी इशारा

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर गेल्या काही महिन्यांपासून संकटाचे सावट आहे. दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने या गावाचा समावेश आपत्तीग्रस्त क्षेत्रात जाहीर केला असला तरी आजतागायत शेतकऱ्यांच्या हाती एकाही रुपयाची मदत पोहोचलेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

अतिवृष्टी, ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान

शेवटच्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आगामी हंगाम धोक्यात आला असून शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.अनेक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहेत.या गंभीर परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करत, शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने 198 शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय, सिंदखेड राजा येथे जोरदार इशारा देत निवेदन सादर केले.

जलसमाधी आंदोलनाची घोषणा

विशेष म्हणजे, प्रत्येक शेतकऱ्याने वैयक्तिक निवेदन दिले असून, समितीच्या वतीने एकत्रित निवेदनही सादर करण्यात आले आहे.निवेदनांमध्ये एकच मुद्दा ठरला आहे — 9 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजता पळसखेड चक्का येथील पातळगंगा नदीवरील पुलाजवळ जलसमाधी आंदोलन करणे.सर्व शेतकऱ्यांचे वैयक्तिक निवेदन आणि संघटनेचे निवेदन एकत्रित रूपात एकच आंदोलन म्हणून साकारले जाणार आहे.शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री बालाजी जोशी म्हणाले –“शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आम्ही बलिदान द्यायलाही तयार आहोत. सरकारने त्वरित निर्णय घेऊन मदत करावी, अन्यथा शेतकरी आंदोलन उग्र होईल.”

Related News

समितीच्या ठाम मागण्या

  1. पळसखेड चक्का येथील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर मदत तातडीने वितरित करावी.

  2. बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर किमान 50,000 रुपये मदत द्यावी.

  3. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दलाल व बँकांच्या जाळ्यात न अडकवता थेट खात्यावर मदत द्यावी.

जर शासन व प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर जलसमाधी आंदोलन अपरिहार्य ठरेल. अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

read also : https://ajinkyabharat.com/chohotta-bazaar-society-shibir-shibir-and-mass-communication-program/

Related News