निर्दयी खून! पुण्यातील चंदननगर हादरलं

निर्दयी खून! पुण्यातील चंदननगर हादरलं

‘काकीला आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग — 35 वर्षीय तरुणाचा हॉकी स्टिक, लाथाबुक्क्यांनी निर्दयी खून! पुण्यातील चंदननगर हादरलं

पुणे : चंदननगरमधील आंबेडकर वसाहतीत किरकोळ वादातून एक थरकाप उडवणारा खून झाला आहे.

‘काकीला आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग दोन तरुणांनी एवढा मनात धरला की 35 वर्षीय साईनाथ उर्फ खलीबली दत्तात्रय जानराव याला हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून ठार मारलं.

ही घटना मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

आरोपी आणि गुन्हा

अटक करण्यात आलेले आरोपी —

  • सोन्या उर्फ आदित्य संतोष वाल्हेकर (वय 21)

  • समर्थ उर्फ पप्पू करण शर्मा (वय 22)

चंदननगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

घटनेचा थरकाप उडवणारा तपशील

सुरुवातीला पोलिसांना “एक बेवारस मृतदेह आहे” अशी माहिती मिळाली. तपासात मृत व्यक्ती साईनाथ जानराव असल्याचे निष्पन्न झाले.

पोस्टमार्टम अहवालात त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात उघड झाले

की, मृत साईनाथने आरोपी वाल्हेकर यांच्या चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटले होते.

याचा राग धरून दोन्ही आरोपींनी साईनाथवर हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत तसेच सोडून दिले. यातच त्याचा मृत्यू झाला.

संतापजनक वळण

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी वाल्हेकर यांनीच पोलिसांना फोन करून “एक व्यक्ती पडला आहे” अशी माहिती दिली.

पण तपासात उघड झालं की, हाच आरोपी मित्रासोबत खुनाचा सूत्रधार आहे. सध्या दोघेही पोलीस

कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/winy-shock/