“रशियाशी संबंधांवरून भारताला टार्गेट, लिंडसे ग्राहमचं वादग्रस्त विधान चर्चेत”

भारत-अमेरिका मैत्रीत तडा?

भारत-अमेरिका संबंध सध्या तणावपूर्ण अवस्थेत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी

नुकतीच सर्गियो गोर यांची भारतातील अमेरिकन राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

भारत-अमेरिका संबंध सुधारण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असेल.

पण या संबंधांमध्ये अडथळा आणणारे नाव म्हणजे लिंडसे ग्राहम, अमेरिकन रिपब्लिकन पार्टीचे ताकदवान सिनेटर.

मोदी-पुतिन भेटीनंतर वाद

८ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची बैठक पार पडली. त्यानंतर मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

यावर ग्राहम यांनी उघडपणे भारताच्या रशियाशी असलेल्या संबंधांवर टीका केली.

भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी ग्राहम यांच्याशी चर्चा करून भारताची बाजू मांडली,

मात्र तरीही त्यांनी भारताविरोधी भूमिकाच कायम ठेवली.

भारताविरोधी विधेयक

ग्राहम यांनी अमेरिकन सिनेटमध्ये एक विधेयक सादर केले होते. त्यात रशियाकडून तेल,

गॅस आणि युरेनियम खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्के टॅरिफ लावण्याची मागणी करण्यात आली होती.

हे विधेयक पास झाले नाही, पण ग्राहम यांची भूमिका स्पष्ट झाली – “जे देश रशियन तेल विकत घेतात, त्यांना तोडलं पाहिजे”.

दुहेरी भूमिका?

जगातील अनेक देश – चीन, युरोप, तसेच अमेरिका स्वत: रशियाकडून ऊर्जा आणि युरेनियम खरेदी करत असताना ग्राहम यांनी विशेषतः भारतावरच आक्रमक भूमिका घेतली.

कोण आहेत लिंडसे ग्राहम?

  • रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ सिनेटर.

  • २०१० साली इराणविरोधी सैनिकी कारवाईचं समर्थन केलेलं.

  • अफगाणिस्तान आणि इराक युद्धकाळात तुरुंगातील मानवी हक्क उल्लंघनांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी.

  • जानेवारी २०२४ मध्ये एका संस्थेच्या अहवालानुसार त्यांना सर्वाधिक राजकीय निधी शस्त्रास्त्र उद्योगाकडून मिळतो.

भारत-अमेरिका संबंधांची जुळलेली मैत्री सध्या परीक्षेतून जात आहे. अमेरिकन राजकारणात लिंडसे ग्राहम यांच्यासारख्या प्रभावी सिनेटरचा भारतविरोधी अजेंडा

आणि आक्रमक भूमिका दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढवू शकतात.

Read also : https://ajinkyabharat.com/666662-ek-ovharmadhyaye-pach-shatkar-lochan-gowdacha-shotak-khele/