अलास्कात 15 ऑगस्टला ट्रम्प–पुतिन भेट; रशियाचा युक्रेनवर बैठकीत अडथळा आणण्याचा आरोप
मॉस्को / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्या कार्यकाळात पदभार घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रथमच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.
ही ऐतिहासिक भेट 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील अलास्का येथे होणार आहे. दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनवर या बैठकीत अडथळा आणण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.
रशियाचा दावा
रशियन संरक्षण मंत्रालयानुसार, युक्रेन सरकार या रशिया-अमेरिका शिखर बैठकीला विफल करण्यासाठी योजना आखत आहे.
मंत्रालयाने टेलिग्राम पोस्टमध्ये म्हटले की, युक्रेनची सुरक्षा सेवा परदेशी पत्रकारांच्या गटाला खारकीवच्या चुगुएव भागात पाठवत आहे, जिथे सीमावर्ती भागातील नागरिकांवर रिपोर्ट करण्याच्या बहाण्याने त्यांची नेमणूक करण्यात येईल.
रशियाचा आरोप आहे की, त्याच वेळी युक्रेनची सेना शहरावर हल्ला करून त्याची जबाबदारी रशियावर ढकलणार आहे.
हल्ल्याचा इशारा
रशियाने दावा केला की, बैठकीच्या आधी युक्रेनचे सशस्त्र दल घनदाट लोकवस्ती असलेल्या भागावर किंवा रुग्णालयावर यूएव्ही व क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ला करू शकतात. त्यानंतर परदेशी पत्रकार तत्काळ नकारात्मक बातम्या
प्रसारित करून रशिया-अमेरिका सहकार्यावर पाणी फेरतील, असा आरोप करण्यात आला आहे.
शांतता चर्चेची अपेक्षा
या भेटीतून रशिया–युक्रेन युद्धाच्या तोडग्यासाठी मार्ग सापडेल, अशी जगभरात अपेक्षा आहे. ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या भेटीची घोषणा करताना म्हटले की, “15 ऑगस्ट 2025 रोजी अलास्कात
माझी आणि पुतिन यांची बहुप्रतिक्षित बैठक होणार आहे. अधिक तपशील लवकरच दिले जातील.”
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे सहयोगी युरी उशाकोव यांनी सांगितले की, अलास्का शिखर बैठकीनंतर पुढील बैठक रशियात होईल, अशी अपेक्षा आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/gharagrat-rugna-vadlyane-citizen-axis/
