ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार आणि सेंट्रल बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अकोला यांच्या संयुक्त
विद्यमाने ग्रामीण विभागातील बेरोजगारांना विविध विषयावर प्रशिक्षण दिले जाते.
या प्रशिक्षणाचा फायदा म्हणजे आपल्या रोजगारात वाढ करून आपल्या कौशल्याचा उपयोग व्यवसायात करून घेण्यासाठी मोलाचे
ठरते त्यापैकीच गेल्या आर्थिक वर्षातील काही निवडक प्रशिक्षणार्थी जे आज विविध क्षेत्रात आपला व्यवसाय सुरु करून आज यशस्वी उद्योजक म्हणून कार्य करीत आहेत.
असे आशिष इंगळे अनिल राऊत करण इंगळे अभिजीत गवई अरुणा आरोळे रागिनी मानकर पूजा जनवाडे योगिता वारकरी
माधुरी निकाळजे दुर्गा मिरगे छाया इंगळे आशा जांभे उमा खैरे यांचा सत्कार यशस्वी उद्योजक म्हणून करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख उद्योजक श्री गणेश काळे सर यांची उपस्थिती लाभली त्यांनी स्व अनुभवातून व्यवसायातील चढ उतार आणि अडचणीवर
मात करून त्या व्यवसायात कसे यश संपादन करून टिकून राहता येते असे आपल्या मार्गदर्शनातून सर्वांना सांगितले तसेच
संस्थेचे संचालक विद्याशंकर सरांनी मार्गदर्शन केले संस्थेचे प्रशिक्षक श्वेता लोडम मॅडम पुनम देशमुख यांनी सर्वांना त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.