ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे सुविधा चा तुतवडा. आमदारांना दिले निवेदन.

ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे सुविधा चा तुतवडा. आमदारांना दिले निवेदन.

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी

बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालयाच्या सुविधा व डॉक्टरांच्या कमतरतेमुळे नागरिकांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत.

याच पार्श्वभूमीवर युथ मूव्हमेंट महाराष्ट्र, शाखा बार्शिटाकळी व एसआयओ

बार्शिटाकळी च्या सदस्यांनी माननीय आमदार हरीशभाऊ पिंपळे निवेदन सादर केले.

या निवेदनात ग्रामीण भागातील आरोग्य सेवांची निकड व रुग्णालयातील तातडीच्या गरजा मांडण्यात आल्या.

विशेषतः खालील तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली:

ANC अँब्युलन्स व गर्भवती महिलांसाठी आवश्यक वैद्यकीय सेवा. बालरोग तज्ज्ञ (Pediatrician).

अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedic) . निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे ग्रामीण भागात गर्भवती महिलांना ANC अँब्युलन्स मिळण्यात अडचण येते.

आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा नसल्यामुळे आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

बालरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे मुलांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत.

अपघात किंवा हाडांशी संबंधित रुग्णांसाठी अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे वेळेत योग्य उपचार होऊ शकत नाहीत.

ग्रामीण भागातील लोकांना या सुविधांचा तातडीने लाभ मिळावा, यासाठी संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी.

नागरिकांचे प्रश्न व मागणी

बार्शिटाकळी ग्रामीण रुग्णालय हे अनेक गावांसाठी आरोग्याचे मुख्य केंद्र आहे.

येथे आवश्यक डॉक्टर व आधुनिक सुविधा नसल्यामुळे रुग्णांना जिल्हा रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात जाणे भाग पडते, ज्यामुळे वेळ व खर्च दोन्ही वाढतात.

यासाठी ANC अँब्युलन्स, बालरोग व अस्थिरोग विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टर यांची तात्काळ नियुक्ती व्हावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.

आमदारांचे प्रतिसाद:

निवेदन स्वीकारल्यानंतर आमदार हरीश पिंपळे साहेबांनी तातडीने आपला पीएशी संपर्क साधला व आताच्या घडीला सुरू असलेल्या बैठकीत हा विषय मांडण्याचे निर्देश दिले.

तसंच ग्रामीण रुग्णालयातील सुविधा वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

युथ मूव्हमेंट महाराष्ट्र अध्यक्ष
एसआयओ बार्शिटाकळी अध्यक्ष

सय्यद आसिम, अम्मार खान सदस्य:- साजिद खान, सफवान खान, सलमान खान, अल्तमश खान, सय्यद फैझुल नूर खान, वसी , हे सर्व उपस्थित होते.

Read Also : https://ajinkyabharat.com/smart-meter-basavanyachaya-paras-mohimela-citizen-protest-electricity-customer-injustice-prevention-manchcha-andwotnacha-gesture/