ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट

ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट

टाकळी बु

विनोद वसु

शेतकरी सुखी तर देश सुखी शेतकरी देशाचा पोशिंदा असे एकेकाळी म्हटल्या जात होते. परंतु शेतकऱ्यांना शेती

Related News

करणे आता अवघड झाले असून ग्रामीण भागातील अनेक ठिकाणचे पांदन रस्ते हे खराब व बिकट परिस्थितीत असून.

शेतकऱ्यांना रस्त्याने जाताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सरकारने पांदण रस्ते बनविण्याकरिता अनेक योजना काढल्या त्यामध्ये.

मुख्यमंत्री व पालकमंत्री पांदण रस्ता योजना परंतु या योजनाचा देखील शेतकऱ्यांना फारसा उपयोग होताना दिसत नाही तर पांदण रस्त्याकडे सरकार सह व

लोकप्रतिनिधीचे देखील दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था ही बिकट झाली

असून शेतीकरण्यासाठी शेतकऱ्याची वहिवाट ही बंद झाल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.

शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने

शेती करायची कशी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. यामुळे शेती विकण्याकडे शेतकऱ्याचा कल हा वाढताना दिसतो आहे.

मात्र सरकार या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देवून ग्रामीण भागातील पांदन रस्ते व्यवस्थित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागातील शेत रस्त्यातील अत्यंत बिकट अवस्था झाली असून शासनाने लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची समस्या सोडवावी

रामकृष्ण ना वसु शेतकरी टाकळी बु

ग्रामीण भागातील बरेचसे पांदन शेत रस्ते अतिशय दुरस्त झालेली असून शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागते

जिवन खवले प्रहार जनशक्ती पक्ष अकोला उपजिल्हाप्रमुख शेतकरी आघाडी

ग्रामीण भागातील सतत पाऊस सुरू असल्यामुळे शेत रस्त्यांची अत्यंत दुरस्त झाली असून याकडे शासनाने लक्ष देऊन शेत रस्त्यांची दुरुस्ती करावी.

सुरेंद्र ओईबे वंचित बहुजन आघाडी अकोट तालुका संघट.

Read Also : https://ajinkyabharat.com/shet-rastache-adaptation-talavat-shetkari-hatabal/

Related News