लोणार (गोपाल तोष्णीवाल):—
महाराष्ट्र मुळातच संताची भूमी भक्तीची संस्कृतीची परंपरेची भूमी म्हणून ओळखली जाते .
संस्कृती धार्मिक परंपरा सन उत्सव अशा विविध परंपरने महाराष्ट्राची संकृती नटलेली आहे.
मराठी पंचांग (कॅलेंडर) प्रमाणे श्रावण महिना म्हणला म्हणजे सणांची मेजवानीच.
गोडधोड पदार्थ आणि आनंदाची उधळण. प्रत्येक सणाचे वेगळे वैशिष्ट्य.
बदलत्या काळानुसार सण साजरे करण्याची पद्धत बदलत असली तरी ग्रामीण संस्कृती आजही हे सण तितक्याच
उत्साहाने आणि धार्मिक पारंपरिक पद्धतीने साजरा करतात श्रावण शुक्ल पंचमीला साजरी होणारी
नागपंचमी हा सर्पदेवतेच्या पूजनाचा दिवस. शेतकऱ्यांसाठी नाग म्हणजे पृथ्वीचा संरक्षक,
उंदिरांचा भक्षक आणि निसर्गाचं संतुलन राखणारा घटक.
या दिवशी नागदेवतेचं प्रतिकात्मक रूप – प्रतिमा, शिवलिंग किंवा चित्र यांच्यावर दूध, लाह्या,
कुंकू, फुले अर्पण करून सर्पांची कृपा राहावी अशी प्रार्थना केली जाते सोबतच येणारा महिलांचा हक्काचा
असाच एक सण म्हणजे (सकरूबा)
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सकरूबा असतो. शहरी भागात फार कमी प्रमाणात पण ग्रामीण भागात तितक्याच
मोठ्या उत्साहाने स्त्रिया सकरूबाची पूजा करतात. या दिवशी शक्यतो सामूहिकरीत्या या सकरूबाची पूजा केली जाते.
सकरूबा म्हणजे मातीपासून तयार केलेले वएक प्रतिकृती (शिल्प )असते. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी महिला सुहासिनी मिळून सोबत एक टोपले
घेऊन वारुळाची माती आणण्यासाठी जातात. प्रथम वारूळाभोवती पाणी फिरवले जाते,
नंतर वारुळाची पूजा करतात, लाह्या गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवतात आणि नमस्कार करून वारुळाची माती घेतात.
महिला स्वतः या पासून सकरूबा तयार करतात किंवा कुंभार काम करणाऱ्या महिला हा सकरूबा तयार करून देतात.
आधारासाठी काड्यांचा वापर करून पाटावर ठेवून हे तयार केले जाते. जेणेकरून त्याला डोक्यावर घेणे सोपे जाते.
त्याला वेगवेगळ्या डाळी अतिशय दुर्मिळ असलेली गुंज तूर,मूग, करडी ,मसूर,इ.) लावून सुशोभित केले जाते.
^नवसाला पावणारा सकरूबा अशी या सणाची ओळख आहे. ग्रामीण भागातच ही पद्धत पहायला मिळते.
वेगवेगळ्या गोष्टींसाठी स्त्रिया नवस करतात आणि त्यासाठी कोणी एक वर्ष, कोणी पाच वर्षे याची पूजा करतात.
संध्याकाळी नवस कबूल केलेल्या सर्व महिला आपापला सकरूबा घेऊन गावातील मुख्य ठिकाणी,
शक्यतो एखाद्या मंदिरासमोर एकत्र जमतात आणि पूजा करून सकरूबाची धार्मिक भक्तिमय गाणी ओव्या विडंबनात्मक
गाणी गाऊन गाण्यावर सकारूबाची नृत्य सादर करतात.
हि सकरूबाची धार्मिक परंपरा संकृती जोपासण्याचे काम अजूनही ग्रामीण भागातील महिला जोपासत आहे.
सांस्कृतिक वारसा
सकरूबा या परंपरांचा उल्लेख ग्रामीण साहित्य, लोककथा आणि ओव्यांमध्ये मोठ्या श्रद्धेने केला जातो. व
ही परंपरा जपणाऱ्या महिलांकडून मुलींना व नव्या पिढीला याची शिकवण दिली जाते.
या माध्यमातून श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि नात्यांमधील पवित्रतेचा वारसा पुढे नेला जातो.
नागपंचमी आणि सकरूबा हे सण केवळ पूजनाचे सोहळे नाहीत, तर निसर्गपूजन, स्त्री-शक्तीचा सन्मान, सामाजिक धार्मिक आणि श्रद्धेचं प्रतीक आहेत.
Read Also :https://ajinkyabharat.com/rahul-gandhi-allegation-modi-arthavasthacha-khoon-banana/