“रमी खेळण्यासाठी कार्यमुक्त करा!” – कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर वंचितची टीका; राजीनाम्याची मागणी

"रमी खेळण्यासाठी कार्यमुक्त करा!" – कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर वंचितची टीका; राजीनाम्याची मागणी

मुंबई/अकोला – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात ऑनलाइन ‘रमी’ जुगार खेळल्याचा

आरोप करत वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.

वंचितकडून असा टोला लगावण्यात आला की, “ज्या माणसाला रमी खेळायची इतकी ओढ आहे,

त्याला रमी खेळण्यासाठीच मोकळं करून द्या, मंत्रिपदात अडकवून ठेवू नका!

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी यासंदर्भात सांगितले –

“राज्याचा कृषीमंत्री हा शेती आणि शेतकऱ्यांबाबत आस्थेचा असावा, त्यांच्या प्रश्नांची जाणीव असावी.

पण कोकाटे यांनी सभागृहात बसून ऑनलाइन जुगार खेळल्याची दृश्यं समोर आली आहेत.

जर ते अशा प्रकारे जबाबदारी झुगारून वागत असतील, तर त्यांना तातडीने मंत्रिपदावरून बाजूला करावं.

जास्तीत जास्त वेळ त्यांना रमी खेळता यावा यासाठीच कार्यमुक्त केलं जावं.”

 शेतकरी संकटात, मंत्री जुगारात?

राज्यभरात अवकाळी पाऊस, कीड व रोग, अनुदान वाटपातील अडचणी अशा असंख्य प्रश्नांनी शेतकरी त्रस्त असताना,

कृषिमंत्री सभागृहात मोबाइलवर गेम खेळत असल्याचा आरोप करत वंचितने संताप व्यक्त केला.

  सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढतोय:

या प्रकरणामुळे विरोधकांच्या टीका वाढल्या असून, राजकीय वर्तुळातही कोकाटेंच्या

भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याप्रकरणी सरकारकडून स्पष्टीकरण येणं बाकी आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/nalayachaya-purat-wahoon-12-vichya-vidyarthayacha-dry/