स्कूटर-मोटारसायकल चालवण्याचे नियम बदलले

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यात

एक महत्त्वपूर्ण बदल होत आहे. तरुणाईसाठी मोटर वाहन

कायद्यात मोठा बदल होऊ घातला आहे. त्यामुळे त्यांच्या

Related News

पंखांना कायद्याचं बळ मिळणार आहे. 16 वं वरीस आता

धोक्याचं नाही तर मोक्याचं राहणार आहे. स्कूटर-मोटारसायकल

चालवण्याच्या नियमात मोठा बदल होणार आहे. राजीव गांधी

सरकारच्या काळात मतदानाचा अधिकार जसा 21 व्या वर्षांहून

18 वर्षी देण्यात आला. तसाच वाहन चालवण्याबाबत हा नियम

मैलाचा दगड ठरणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग

मंत्रालयाने मोटर वाहन कायद्यात बदलाचा प्रस्ताव आणला

आहे. त्यातंर्गत अनेक मोटार अपघात न्यायाधिकरणातील

प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी 12 महिन्यांचा

कालावधी देण्यात येईल. याशिवाय नवीन संशोधनानुसार

मोटारसायकलच्या व्यावसायिक वापरासाठी कंत्राटी वाहतुकी

साठी मान्यता देण्यात येईल. त्यामुळे सध्याच्या रॅपिडो आणि

युबर यासारख्या कंपन्यांना कायदेशीररित्या दुचाकीचा

व्यावसायिक वापर करता येईल.

Read also: https://ajinkyabharat.com/special-navratri-devi-darshan-yatra-for-navratri-devotees/

Related News