रुग्णांना तपासणीसाठी दिवसांदिवस – महिन्यांची प्रतीक्षा

आ.पठाणांनी उठवला गंभीर प्रश्न

अकोला: अकोला वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एमआरआय मशीनची टंचाई रुग्णांसाठी गंभीर समस्या ठरली आहे. मशीनची उपलब्धता कमी असल्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी महिनोन् महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे, ज्यामुळे गंभीर आजारांचे उपचार लांबणीवर जात असून रुग्णांचे जीवन धोक्यात येत आहे.पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी या पार्श्वभूमीवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तातडीने नवीन एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.आ.पठाण यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या निधीतून उभारलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असूनही फक्त एकच एमआरआय मशीन उपलब्ध आहे, ज्यामुळे तपासणीसाठी रुग्णांची संख्या फार वाढलेली आहे. यापूर्वीही उन्हाळी व पावसाळी अधिवेशनात आ. पठाण यांनी दोन वेळा हा प्रश्न सभागृहात उपस्थित करून रुग्णांच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते.आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञानाच्या या कमतरतेमुळे रुग्णांना गंभीर त्रास होत असल्याने, प्रशासनाकडून लवकरात लवकर उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/each-tiktavar-30-savalat/