रुग्णवाहिकेने कुत्र्याला धडक दिली; संतप्त मालकाने चाबी काढली, पेशंटचा मृत्यू

रुग्णवाहिकेने कुत्र्याला धडक दिली; संतप्त मालकाने चाबी काढली, पेशंटचा मृत्यू

अकोट (प्रतिनिधी):

अकोट तालुक्यात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका गंभीर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात

असताना रुग्णवाहिकेची धडक कुत्र्याला बसली. या घटनेनंतर संतप्त कुत्रा मालक शंकर लालू मीतकर याने

Related News

रुग्णवाहिकेचा पाठलाग करत थेट वाहनाची चाबीच काढून घेतली. यामुळे रुग्णवाहिकेत असलेल्या गंभीर रुग्णाचा मृत्यू झाला.

घटनेची सविस्तर माहिती अशी:

  • रुग्णवाहिका चालक सुखदेव मालठाणकर यांना अकोट नगरपालिकेतून गंभीर जखमी कर्मचाऱ्यास अकोला हॉस्पिटलमध्ये तातडीने घेऊन जाण्यासाठी कॉल आला होता.

  • मालठाणकर रुग्णाला घेऊन निघाले असताना चौहट्टा बाजार परिसरात रस्त्यात आलेल्या कुत्र्याला गाडीची धडक बसली.

  • संतप्त झालेल्या शंकर मीतकरने रुग्णवाहिकेचा दोन किलोमीटर पाठलाग करत गाडी अडवली आणि चाबी काढून घेतली.

  • रुग्ण गंभीर अवस्थेत असतानाही त्याला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेता आलं नाही आणि रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

प्रकरण नोंद

  • शंकर मीतकरविरोधात चौहट्टा बाजार पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • रुग्णवाहिका चालकाला मारहाण केल्याचाही आरोप असून पोलिसांनी मीतकरला ताब्यात घेतलं आहे.

  • पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ही घटना अकोटमध्ये मोठी खळबळ निर्माण करणारी ठरली असून, आपत्कालीन सेवांमध्ये अडथळा आणल्याचा गंभीर परिणाम समाजासमोर आला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bayapur-talukaye-shetkyanna-mofat-biyane-vatap-soyatur-project/

Related News