Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यासाठी पंचांची नियुक्ती, रुचिरा पल्लियागुरुगे यांच्या नावाने वाढली चर्चा
आशिया कप 2025 च्या साखळी फेरीच्या सामन्यांची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 10 पंच आणि 2 सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर स्पर्धेची बारीक नजर असणार आहे.विशेष लक्षवेधी म्हणजे 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार असून त्यासाठी खास पंचांची निवड करण्यात आली आहे. श्रीलंकेचे रुचिरा पल्लियागुरुगे आणि बांगलादेशचे मसुदुर रहमान हे मैदानी पंच, अफगाणिस्तानचे अहमद पक्तीन आणि इजतुल्लाह सफी हे TV आणि चौथा पंच म्हणून काम पाहतील. मॅच रेफरी म्हणून वेस्ट इंडिजचे रिची रिचर्डसन आणि झिम्बाब्वेचे अँडी पायक्रॉफ्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विशेष चर्चा रुचिरा पल्लियागुरुगे यांच्या नियुक्तीमुळे निर्माण झाली आहे. वनडे वर्ल्ड कप 2019 आणि गेल्या वर्षी भारत-विरुद्ध श्रीलंका मालिकेतील त्यांच्या अनेक चुकीच्या निर्णयांमुळे क्रीडाप्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या निर्णयाची तुलना स्टीव्ह बकनरशी केली असून या सामन्यासाठी आधीच भरलेली धडकी अधिक वाढली आहे.आशियाई क्रिकेट परिषदेने या पंच आणि सामनाधिकारी नियुक्तीची घोषणा साखळी फेरीच्या सामन्यांसाठीच केली आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/pimpkhutyachaya-dalit-vasti-payle-gatare-gatare-dasancha-empire-vadle/